खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात पर्यटकांनी अनुभवला शून्य सावलीचा अविष्‍कार

कुरुंदवाड : जमीर पठाण खिद्रापूर (ता शिरोळ) कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप आणि त्याच्या ओळंबा रेषेत खाली असणारी रंगशिळा येथे आज (रविवार) 50 सेकंद शून्य सावलीचा अनुभव पहायल मिळाला. त्याचबरोबर सकाळी सूर्योदयावेळी 6 वाजून 28 मिनिटांनी किरणोत्सवही झाला. गाभा-यातील शिवलिंगावर सूर्यकिरणांनी अभिषेक केला. हाच सुंदर भौमितिक आणि खगोलीय अविष्कार पर्यटकांना अनुभवायला मिळाला. दरम्यान पुढारी ऑनलाईनने “सावली सोडणार, आज उद्या साथ” … The post खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात पर्यटकांनी अनुभवला शून्य सावलीचा अविष्‍कार appeared first on पुढारी.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात पर्यटकांनी अनुभवला शून्य सावलीचा अविष्‍कार

कुरुंदवाड : जमीर पठाण
खिद्रापूर (ता शिरोळ) कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप आणि त्याच्या ओळंबा रेषेत खाली असणारी रंगशिळा येथे आज (रविवार) 50 सेकंद शून्य सावलीचा अनुभव पहायल मिळाला. त्याचबरोबर सकाळी सूर्योदयावेळी 6 वाजून 28 मिनिटांनी किरणोत्सवही झाला. गाभा-यातील शिवलिंगावर सूर्यकिरणांनी अभिषेक केला. हाच सुंदर भौमितिक आणि खगोलीय अविष्कार पर्यटकांना अनुभवायला मिळाला.
दरम्यान Bharat Live News Media ऑनलाईनने “सावली सोडणार, आज उद्या साथ” खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात शून्य सावलीचा अविष्कार अनुभवायला मिळणार असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांची हा अविष्कार पाहण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी झाली होती.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो.
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर मंदिर पश्चिम महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रातील तसेच धार्मिक पर्यटनामध्येही महत्त्वाचे मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असल्याने याची अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेत.
शून्य सावली ही खगोलशास्त्रीय घटना आहे. प्रत्येक वर्षी 2 वेळा ही घटना घडत असते. सूर्य मध्यान्हाच्या स्थितीत येतो, तेव्हा सूर्याची लंबरुप किरणे पडतात. अशावेळी शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिर येथे शनिवार दुपारी 12 वाजून 27 मिनिटांनी शून्य सावलीचा अनुभव अनेकांनी अनुभवला. उत्तरेतील कर्कवृत्तापर्यंत दि. 21 जून पर्यंत व दक्षिणेस मकरवृत्तापर्यंत दि. 22 डिसेंबर पर्यंत चालते. शून्य सावलीचा अनुभव शिरोळ भागात 12:25 ते 12:26 या काळात अनुभवता आला. आजपासून 30 किलोमीटर उत्तरेला म्हणजेच कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली या पट्ट्यात सोमवार 12 : 25 वाजता 45 सेकंद शून्य सावली अनुभवता येणार आहे.
यावेळी इतिहास अभ्यासक शशांक चोथे, श्रीहरी कोळी, ओम गुरव, सरपंच सारिका पाटील, पोलीस दीपाली पाटील, संजय स्वामींसह आदी पर्यटक आणि भाविकांनी हा अविष्कार पाहण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा :

Madhya pradesh Politics : मध्‍य प्रदेशमध्‍ये काँग्रेसला आणखी एक धक्‍का, आमदार निर्मला सप्रे भाजपमध्‍ये दाखल 
हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरू; जवान मोठ्या संख्येने पूंछमध्ये दाखल

Solapur Lok Sabha: सोलापुरात सुशिलकुमार शिंदेंना चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागेल : सुभाष देशमुख

Latest Marathi News खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात पर्यटकांनी अनुभवला शून्य सावलीचा अविष्‍कार Brought to You By : Bharat Live News Media.