मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार सप्रे भाजपमध्ये दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ( दि. ५ मे) मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बीना मतदारसंघातील ल काँग्रेसच्या आमदार निर्मला सप्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ( Madhya pradesh Politics ) मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सभेत निर्मला यांनी रहाटगडमध्ये भाजप प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली. विधानसभा निवडणुकीत निर्मला सप्रे यांनी भाजपचे उमेदवार आणि दोन वेळा आमदार महेश राय यांचा 6000 हून अधिक मतांनी पराभव केला होता.
मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर हल्लबोल
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार निर्मला सप्रे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी महिलांच्या संदर्भात चुकीचे बोलले होते, मी सुद्धा आरक्षित प्रवर्गातील महिला आमदार आहे. त्यांच्या बोलण्याने मी दुखावली आहे. भाजपमध्ये प्रवेश केला कारण येथे महिलांचा आदर केला जातो. निर्मला सप्रे यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. भाजपच्या नेत्यांसह काँग्रेसच्या नेत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. रविवारी सकाळपर्यंत निर्मला सप्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती स्थानिक पदाधिकार्यांसह नेत्यांना नव्हती.
निर्मलाच्या या निर्णयामागे खुराईचे माजी आमदार अरुणोदय चौबे आणि मंत्री गोविंद सिंह राजपूत यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बीना विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार निवडणूक
काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याने बीना विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आमदार निर्मला सप्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाचे भाजप जिल्हाध्यक्ष गौरव सिरोठिया यांनी स्वागत केले. बीना परिसराचा विकास आता अधिक गतीने होणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, निर्मला सप्रे यांच्या निर्णायामुळे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर डॉ.आनंद अहिरवार यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
हेही वाचा :
Lok Sabha Elections 2024 : भाजप उमेदवार करण भूषण यांच्या ताफ्याचे ‘गोळीबारा’ने स्वागत! व्हिडिओ व्हायरल
Lok Sabha Election 2024 | जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Latest Marathi News मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार सप्रे भाजपमध्ये दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
