जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने त्यांच्या सोशल मीडियावर एक कथित व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्यांना विशिष्ट उमेदवाराला मतदान न करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी काँग्रेसने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय, कर्नाटक भाजप अध्यक्ष बी. वाय विजयेंद्र यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. … The post जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार appeared first on पुढारी.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भाजपने त्यांच्या सोशल मीडियावर एक कथित व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्यांना विशिष्ट उमेदवाराला मतदान न करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी काँग्रेसने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय, कर्नाटक भाजप अध्यक्ष बी. वाय विजयेंद्र यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. Lok Sabha Election 2024
याबाबत काँग्रेसचे मीडिया प्रभारी रमेश बाबू यांनी सांगितले की, भाजपने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एससी, एसटी समाजाविरुद्ध द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओचा उद्देश लोकांमध्ये शत्रुत्वाची भावना वाढवणे. आणि एससी, एसटी समाजाविरुद्ध द्वेष पसरवणे हा आहे. हा व्हिडिओ आचारसंहितेचा भंग करणारा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे एका विशिष्ट धर्माचे समर्थन करणारे आणि एससी, एसटी समाजाचे शोषण करणारे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 कर्नाटक भाजपच्या अधिकृत एक्स अकांउटवर व्हिडिओ शेअर
कर्नाटक भाजपच्या अधिकृत एक्स अकांऊटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा एक चित्रित केलेला व्हिडिओ आहे. ज्यामध्ये राहुल गांधी आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ॲनिमेटेड पात्रांच्या रूपात दाखवले आहेत. पक्ष्यांच्या घरट्यात एससी, एसटी आणि ओबीसी नावाची अंडी ठेवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण राहुल गांधी त्यात मुस्लिम नावाची अंडी घालतात. मुस्लीम नावाची पिल्लं अंड्यातून बाहेर पडल्यावर ती इतर तीन पिलांपेक्षा खूप मोठी दिसतात. त्यानंतर ते सर्व निधी एकटेच खातात आणि उरलेली पिल्ले घरट्यातून बाहेर फेकून देतात.

Congress files a complaint against BJP national president JP Nadda, BJP social media in-charge Amit Malviya, BJP state president BY Vijayendra over a video posted by BJP Karnataka on their social media for allegedly intimidating members of Schedule caste or tribe to not vote for… pic.twitter.com/L0js2KjVRh
— ANI (@ANI) May 5, 2024

हेही वाचा 

राजकारणात देव, धर्म आणणार्‍या भाजपला सत्तेतून हद्दपार करा
Arvinder Singh Lovely joins BJP: दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश
Telangana | भाजपला मत देणार म्हटल्यावर काँग्रेस उमेदवारानं महिलेच्या कानाखाली मारलं, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार Brought to You By : Bharat Live News Media.