विराट कोहलीने रचला इतिहास! एका डावात केले 2 मोठे विक्रम
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Record : किंग कोहली या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय फलंदाज विराट कोहली एकामागून एक विक्रम करत आहे. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोहली सलामीला आला आणि त्याने स्फोटक फलंदाजी केली. एका बाजूने कर्णधार फाफ डू प्लेसिस शानदार फलंदाजी करत होता, तर दुसरीकडे कोहली वादळ निर्माण करत होता. या सामन्यात कोहलीने 27 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार मारले आणि 155.56 च्या स्ट्राईक रेटने 42 धावा फटकावल्या. या खेळीसह त्याने दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
आयपीएलमध्ये 4000 धावा करणारा पहिला खेळाडू
विराट कोहली आयपीएलमध्ये 4000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या खात्यात आतापर्यंत एकूण 4039 धावा जमा झाल्या आहेत. या बाबतीत त्याने शिखर धवनचा (3945 धावा) विक्रम मोडला. या बाबतीत रोहित शर्मा (3918) तिसऱ्या, डेव्हिड वॉर्नर (3710) चौथ्या आणि सुरेश रैना (3559) पाचव्या स्थानावर आहे.
टी-20 कारकिर्दीत 12500 धावा
यासह कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 कारकिर्दीत 12500 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला त्याच्या टी-20 कारकिर्दीत हा टप्पा गाठता आलेला नाही. या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत 11482 धावा केल्या आहेत. शिखर धवन 9797 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ज्याने 14562 धावा केल्या आहेत.
टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
14562 धावा : ख्रिस गेल
13360 धावा : शोएब मलिक
12900 धावा : किरॉन पोलार्ड
12536 धावा : विराट कोहली*
कोहलीने ऑरेंज कॅप पुन्हा मिळवली
कोहलीने आयपीएल 2024 मध्ये पुन्हा एकदा ऑरेंज कॅपवर कब्जा केला. यापूर्वी ही कॅप चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडकडे होती. आता कोहली त्याच्यापेक्षा जास्त धावा करून या कॅपसाठी पात्र ठरला आहे. कोहलीच्या आता या मोसमात 11 सामन्यांत 542 धावा झाल्या आहेत, तर गायकवाड दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 10 सामन्यात 509 धावा आहेत.
The post विराट कोहलीने रचला इतिहास! एका डावात केले 2 मोठे विक्रम appeared first on Bharat Live News Media.