Nagar : मृत चालकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

संगमनेर/संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी केलेला पाठलाग चुकविण्याच्या नादात बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारी पिकअप चालकासह 70 ते 75 फूट खोल विहिरीत कोसळली होती. 12 तासानंतर पिकअपचा शोध लागला. दरम्यान, दुर्घटनेच्या दुसर्या दिवशी तब्बल 24 तासानंतर पिकअपचा चालक गोरख खेमनर याचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू फोर्सचा तरुण गोविंद तुपे यांना यश आले. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी दोषी असणार्या वाळू तस्करांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा संतप्त मृत चालकाच्या नातेवाईकांनी घेतला. पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला, मात्र संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे पो. नि. देविदास ढुमणे यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदनास घेऊन गेले.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक शिवारात जवळेकडलक रोडवरील गोर्डे वस्ती येथे बेकायदेशीरत्या वाळू वाहतूक करणारी पिकअप पोलिसांचा पाठलाग चुकविण्याच्या नादात थेट 75 फूट सिमेंटचे कठडे तोडून विहिरीत कोसळली. पिकअपमध्ये मागे बसलेले सुदाम राजू वारे (वय 25), सुनील महादू वारे (वय 24), संतोष शिवाजी मेंगाळ (वय 25), समीर सदाशिव मेंगाळ (वय 19, डिग्रस) हे 4 मजूर दोराच्या साह्याने विहिरीबाहेर सुखरूप येवून पळून गेले, मात्र चालक गोरख खेमनर पिकअपसह खोल विहिरीत बुडाला. विहिरीत पिकअपमधील ऑइल व डिझेल सांडल्यामुळे पाण्यावर काळा तरंग आला होता. सिन्नर येथून आलेल्या रेस्क्यू फोर्सचे गोविंदा तुपे यांनी ऑक्सिजन किट घालून विहिरीत पाण्यात उडी घेतली.
शोध घेतला असता पिकअप सापडला. दुर्घटना घडल्यानंतर तब्बल 12 तासानंतर क्रेनच्या साह्याने पिकअप विहिरीतून बाहेर काढला. पुन्हा तुपे यांनी विहिरीत चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मृतदेह सापडण्यासह ऑक्सिजन घेण्यास अडथळा आला. सायंकाळपर्यंत प्रयत्न करू नये, चालकाचा मृतदेह हाती लागला नव्हता. त्यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. दुसर्या दिवशी रविवारी सकाळी पुन्हा मृत चालकाचा मृतदेह गळ सोडून सकाळी 10 वाजता हाती लागला.
हेही वाचा :
दुर्दैवी ! विजेचा धक्का लागून ९ गायी दगावल्या
पुणे शहरात घरफोडीच्या तीन घटना
The post Nagar : मृत चालकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार appeared first on पुढारी.
संगमनेर/संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी केलेला पाठलाग चुकविण्याच्या नादात बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारी पिकअप चालकासह 70 ते 75 फूट खोल विहिरीत कोसळली होती. 12 तासानंतर पिकअपचा शोध लागला. दरम्यान, दुर्घटनेच्या दुसर्या दिवशी तब्बल 24 तासानंतर पिकअपचा चालक गोरख खेमनर याचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू फोर्सचा तरुण गोविंद तुपे यांना यश आले. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी …
The post Nagar : मृत चालकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार appeared first on पुढारी.
