नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवाः आज (दि.4) सकाळी 11 च्या सुमारास नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असताना बंद पडलेल्या ट्रकला बाजू देऊन संथ गतीने घाटातून महामंडळाची गाडी उतरत असताना मिक्सरने मागच्या बाजूने महामंडळाच्या गाडीला धडक दिली. यावेळी एमएच 20 बीएल 2607 या एसटीचा चिल्ली नांदगव्हाण घाटात भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेवर असलेल्या पुलाच्या कठड्यावर गाडी अडकल्यामुळे सर्वांचे …

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

यवतमाळ, Bharat Live News Media वृत्तसेवाः आज (दि.4) सकाळी 11 च्या सुमारास नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असताना बंद पडलेल्या ट्रकला बाजू देऊन संथ गतीने घाटातून महामंडळाची गाडी उतरत असताना मिक्सरने मागच्या बाजूने महामंडळाच्या गाडीला धडक दिली. यावेळी एमएच 20 बीएल 2607 या एसटीचा चिल्ली नांदगव्हाण घाटात भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेवर असलेल्या पुलाच्या कठड्यावर गाडी अडकल्यामुळे सर्वांचे प्राण वाचले. या बस मध्ये एकूण 31 प्रवासी आणि चालक एस .एम. मस्के व वाहक एल .एच .गायकवाड होते. चालकाच्या सावधानतेमुळे दरीत कोसळणारी बस पुलाच्या कठड्याला अडकली.
नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षापासून बंद होते. मागील सहा महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली असून जागोजागी तुकड्याने काम करण्याचा कार्यक्रम चालू आहे. या काम करण्याच्या पद्धतीमुळे घाटात रोजच अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, प्रवाशांकडून अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या गोष्टीची त्वरित दखल घेऊन, घाटातील रस्ता पूर्ण करावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
हेही वाचा

यवतमाळ : लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याची कारागृहात रवानगी
यवतमाळ : डिझेल टॅंकरचा अपघात होऊन झालेल्या स्फोटात एक ठार, दोन गंभीर
पुंछमध्ये हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवादी हल्ला; पाच जवान जखमी