ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांना मोठा धक्का, स्थानिक निवडणुकांत नामुष्कीजनक पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीआधीच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (UK PM Rishi Sunak) यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनमधील सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पक्ष १४ वर्षांनंतर पुन्हा सत्तेवर येईल अशी शक्यता व्यक्त …

ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांना मोठा धक्का, स्थानिक निवडणुकांत नामुष्कीजनक पराभव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीआधीच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (UK PM Rishi Sunak) यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनमधील सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पक्ष १४ वर्षांनंतर पुन्हा सत्तेवर येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाची ४० वर्षांतील ही सर्वात वाईट कामगिरी असल्याचे बोलले जात आहे.
लेबर पक्षाने इंग्लंडमधील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थावर नियंत्रण मिळवले आहे. जे त्यांना अनेक दशकांपासून जमले नव्हते. तसेच त्यांनी संसदेच्या एक जागेसाठी झालेली पोटनिवडणूक जिंकली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत या निकालांची पुनरावृत्ती झाल्यास सत्ताधारी कंझर्व्हेटिव्हचा हा सर्वात मोठा पराभव असेल, असे संकेत राजकीय तज्ज्ञांनी दिले आहेत.
ब्रिटनमधील विरोधी लेबर पक्षाने शुक्रवारी उत्तर इंग्लंडमधील एका संसदीय जागेवर विजय मिळवला. तसेच या पक्षाने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (councils) निवडणुकीत बाजी मारली. कंझर्व्हेटिव्ह पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, या धक्क्यादरम्यान कंझर्व्हेटिव्ह पक्षाला एक दिलासा मिळाला. तो म्हणजे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे बेन हौचेन यांनी टीस व्हॅलीच्या उत्तरेकडील प्रदेशाच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली. गेल्या गुरुवारी संपूर्ण इंग्लंडमधील स्थानिक प्राधिकरणांच्या २ हजारहून अधिक जागांसाठी आणि राजधानी लंडनसह काही हाय-प्रोफाइल महापौरपदाच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले होते.
दरम्यान, लेबर पक्षाचे उमेदवार ख्रिस वेब यांनी ब्लॅकपूल साऊथ पोटनिवडणुकीत विजय मिळवला. ही जागा यापूर्वी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे स्कॉट बेंटन यांच्याकडे होती. पण लॉबिंग घोटाळ्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत लेबर पक्षाचे उमेदवार ख्रिस वेब यांनी १०,८२५ मते मिळवत विजय मिळवला तर कंझर्व्हेटिव्ह उमेदवाराला ३,२१८ मते मिळाली. येथे २०१९ च्या निकालानंतर लेबर पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये २६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ब्रिटनमधील पोटनिवडणुकीच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी वाढ आहे, असे निवडणूक तज्ज्ञ जॉन कर्टिस यांनी सांगितले.
“हे सार्वत्रिक निवडणुकीच्याआधी घडले आहे. ब्रिटनमधील जनतेचा मूड असा आहे की आता बदलाची वेळ आली आहे,” अशी प्रतिक्रिया लेबर पक्षाचे राष्ट्रीय प्रचार समन्वयक पॅट मॅकफॅडन यांनी दिली आहे.
हे ही वाचा :

रशियाने युक्रेनवर डागले क्षेपणास्त्र, प्रसिद्ध ‘हॅरी पॉटर कॅसल’ उद्ध्वस्त, ५ जणांचा मृत्यू
अमेरिकेत 10 खलिस्तान्यांवर लूकआऊट नोटिशीची तयारी
अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचे साईड इफेक्ट; ब्रिटिश कंपनीची कबुली