तिसगावात आढळले मानवी शरीराचे अवशेष
पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तिसगाव येथे 1 ऑक्टोबर रोजी बेवारस व्यक्तीच्या मृतदेहाची कवटी, दोन हाडे व इतर साहित्य आढळून आले. मृत व्यक्ति व त्याच्या नातेवाईकाबाबत पाथर्डी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी केले. दि.1 रविवारी ऑक्टोबर रोजी तालुक्यातील तिसगाव शिवारात तिसगाव- पाथर्डी रस्त्यावर नायरा पेट्रोल पंपामागे सकाळी नऊ वाजता वाहिद पठाण हे त्यांच्या शेत गट नं. 660 मधील शेतातील तुरीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी शेतीच्या बांधावरुन पायी जातत होते.
यावेळी पठाण यांना त्यांच्या शेतात पांढर्या रंगाची मानवी डोक्याची कवटी दिसली. कवटीजवळ काळे पांढरे रंगाचे केस, जोडवे, काचेच्या बांगड्या व पिवळ्या रंगाचे दोन मनी असलेली काळी पोत पडलेली दिसली. तसेच कवटी जवळ एक सहावार रंगीबेरंगी साडी असल्याचे आढळून आली. या अनोळखी मृतकासंदर्भात कोणाला काही महिती असल्याच पाथर्डी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे
हेही वाचा :
अकाली प्रसूतीची नेमकी कारणे काय?
Marathwada Rain : मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा: अतिवृष्टीने पिके जमीनदोस्त, नदीनाल्यांना पूर
The post तिसगावात आढळले मानवी शरीराचे अवशेष appeared first on पुढारी.
पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तिसगाव येथे 1 ऑक्टोबर रोजी बेवारस व्यक्तीच्या मृतदेहाची कवटी, दोन हाडे व इतर साहित्य आढळून आले. मृत व्यक्ति व त्याच्या नातेवाईकाबाबत पाथर्डी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी केले. दि.1 रविवारी ऑक्टोबर रोजी तालुक्यातील तिसगाव शिवारात तिसगाव- पाथर्डी रस्त्यावर …
The post तिसगावात आढळले मानवी शरीराचे अवशेष appeared first on पुढारी.