लिटिल चॅम्प्स गौरीने उंचावलं ब्राह्मणगावसह नगर जिल्ह्याचे नाव

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  झी मराठी वाहिनीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स 2023 ची महाविजेती नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील गौरी अलका पगारे ही ठरली. कार्तिकी गायकवाड हिच्यानंतर या स्पर्धेची विजेती ठरण्याचा मान नगर जिल्ह्याला दुसर्‍यांदा मिळाला. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा शनिवारी (दि.25) पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषिकेश ढवळीकर, नगर जिल्ह्यातील जयेश … The post लिटिल चॅम्प्स गौरीने उंचावलं ब्राह्मणगावसह नगर जिल्ह्याचे नाव appeared first on पुढारी.
#image_title

लिटिल चॅम्प्स गौरीने उंचावलं ब्राह्मणगावसह नगर जिल्ह्याचे नाव

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  झी मराठी वाहिनीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स 2023 ची महाविजेती नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील गौरी अलका पगारे ही ठरली. कार्तिकी गायकवाड हिच्यानंतर या स्पर्धेची विजेती ठरण्याचा मान नगर जिल्ह्याला दुसर्‍यांदा मिळाला. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा शनिवारी (दि.25) पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषिकेश ढवळीकर, नगर जिल्ह्यातील जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे लिटील चॅम्प्स टॉप 6 मध्ये होते.
या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या गौरी पगारेने विजेती होण्याचा मान पटकावला. यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला 1 लाख 50 हजारांचा धनादेश आणि चांदीची वीणा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी, वैशाली माडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली. तर, उपविजेत्या ठरलेल्या श्रावणी वागळे आणि जयेश खरेला प्रत्येकी 1 लाखाचा धनादेश देण्यात आला.
गरिबीतून घडलाय गौरीचा जीवनप्रवास..!
सारेगमपची महाविजेती ठरलेली गौरी ही अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे आली आहे. आई अलका यांचा संघर्ष शब्दात मांडण्या पलिडकचा आहे. लहान वयात गौरीने मोठी गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकारलं, हे विशेष!
गौरीच्या घरची अत्यंत गरीबी. आई मोलमजुरी करते. वडिलांचे छत्र तीन-चार वर्षांपूर्वीच हरपले. मात्र, आई अलका पगारे यांची यांची जिद्द होती की, मुलीने नाव कमवावे. आजोबा रंभू नाना पगारे, मामा विलास पगारे यांचीही आर्थिक परिस्थिती नाजूक, पण गायकी हिच तिची आराधना. गौरीला इ. 6 वीपासूनच भजनाची आवड निर्माण झाली. ब्राम्हणगावात भजनाचा सराव करता-करता तिला भक्तीगीते, भावगीतांसह इतर गाण्यांची आवड निर्माण झाली. संगीत साधनेचा कुठलाही क्लास नाही, पण केवळ गौरीची जिद्द मोठी आहे.
शेतात काम करताना, नदीवर धुणे धुताना गौरी आईच्या मागेच असायची. एकीकडे आई काम करायची, तर गौरी तिच्या तिच्या गाण्याच्याच नादात असे. ग्रामीण भाग, सोयी- सुविधांचा अभाव, पण मनात आपल्या अंगी असलेली गाण्याची कला तोडकं-मोडकं शिकत-शिकत पुढे न्यायचीच, ही गौरीची महत्त्वाकांक्षा अखेर झी मराठीच्या सारेगमप लिटिल चॅम्पस्ची विजेती ठरल्याने पूर्ण झाली.
कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा : कोल्हे
गौरीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तिचे अभिनंदन केले. हा कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचेे गौरवोद्गार त्यांनी काढले. ग्रामीण भागातूनही कलाकार पुढे जाऊ शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण गौरीने समोर ठेवले आहे. कला अधिक बिकट संघर्षातून फुलते, बहरते. गाणे गावेसे सर्वांना वाटते, पण तितका मंजुळ कंठ मिळणे ही ईश्वरीय देणगी असावी लागते. गौरीच्या या यशानेे कोपरगावसह महाराष्ट्राची मान गौरवाने उंचावली आहे. गौरीसह तिच्या कुटुंबियांना नेहमी सहकार्य करू, अशा भावना स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केल्या. संजीवनी उद्योग समूहाचे बिपीनराव कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी गौरीचे अभिनंदन केले. सर्व स्तरातून गौरीवर अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.
यशाचं श्रेय दिलं परीक्षकांना
विजेतेपद पटकावल्यावर गौरी म्हणाली, सारेगमप लिटिल चॅम्प्स 2023 चा किताब मिळाल्याचा खूप आनंद होतोय. माझ्याकडे शिक्षण नसतानाही मी इतक्या उंचीवर पोहचली. माझ्या यशात ज्येष्ठ गायक व स्पर्धेचे परीक्षक सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी आणि वैशाली माडे यांची खूप मेहनत आहे. त्यांनी मला प्रोत्साहन दिले. माझ्या विजेतेपदाचे सर्व श्रेय त्यांचं आहे. माझ्या आईने खूप मेहनत घेतली. म्हणूनच मी इथवर पोहोचू शकले.
The post लिटिल चॅम्प्स गौरीने उंचावलं ब्राह्मणगावसह नगर जिल्ह्याचे नाव appeared first on पुढारी.

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  झी मराठी वाहिनीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स 2023 ची महाविजेती नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील गौरी अलका पगारे ही ठरली. कार्तिकी गायकवाड हिच्यानंतर या स्पर्धेची विजेती ठरण्याचा मान नगर जिल्ह्याला दुसर्‍यांदा मिळाला. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा शनिवारी (दि.25) पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषिकेश ढवळीकर, नगर जिल्ह्यातील जयेश …

The post लिटिल चॅम्प्स गौरीने उंचावलं ब्राह्मणगावसह नगर जिल्ह्याचे नाव appeared first on पुढारी.

Go to Source