मनीष सिसोदिया यांच्या जामीन प्रकरणी ईडी-सीबीआयला नोटीस

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन प्रकरणी उच्च न्यायालयाने ईडी-सीबीआयला आज (दि.३) नोटीस बजावली. दिल्ली उच्च न्यायालयात सिसोदियांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने जामीनप्रकरणी ईडी-सीबीआयला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. तसेच न्यायालयाने सिसोदियांना आजारी पत्नी सीमा यांना आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी दिली. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया …

मनीष सिसोदिया यांच्या जामीन प्रकरणी ईडी-सीबीआयला नोटीस

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन प्रकरणी उच्च न्यायालयाने ईडी-सीबीआयला आज (दि.३) नोटीस बजावली. दिल्ली उच्च न्यायालयात सिसोदियांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने जामीनप्रकरणी ईडी-सीबीआयला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. तसेच न्यायालयाने सिसोदियांना आजारी पत्नी सीमा यांना आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी दिली.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा ३० एप्रिल रोजी राऊज अव्हेन्यू नायालयाने जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत, प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या खंडपीठासमोर जामीन याचिका दाखल केली होती. सिसोदिया यांना ११ महिन्यांहून अधिक काळ कोठडीत ठेवण्यात आले असून कारवाईला विलंब होत असल्याचे याचिकेत म्हटले होते. यावर शुक्रवारी सुनावणी झाली असून, न्यायालयाने याप्रकरणी ईडी-सीबीआयला उत्तर मागितले आहे.
दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या जामीनाला सीबीआयने विरोध केला होता. सीबीआयने म्हणले होते की, “आरोपी साक्षीदारांवर प्रभाव टाकणार नाही आणि पुराव्यांशी छेडछाड करणार नाही. हे जोपर्यंत सिद्ध होत नाही. तोपर्यंत आरोपीला जामीन दिला जाऊ शकत नाही.” तर मनीष सिसोदिया यांच्या जामीन प्रकरणाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.
हेही वाचा :

Arvind Kejriwal: निवडणुकांमुळे केजरीवालांच्या जामीनावर विचार करू शकतो; सर्वोच्च न्यायालयाने दिले संकेत
नागपूर महापालिकेने ६०० कोटींची जमीन १ रुपया लीजवर देण्याचा निर्णय मागे घ्यावा : ठाकरे
Lok Sabha Election 2024 | भरीत करण्यापेक्षाही मतदान करणं सोपं, मतदान जन-जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न चर्चेत