हिंगोली: हट्टा-आडगाव मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; ६ जण जखमी

हट्टा, पुढारी वृत्तसेवा : हट्टा ते आडगाव दरम्यान पेट्रोल पंपासमोर भरधाव दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात  ६ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.३)  सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. रामदास उन्हाळे (वय ४२), अंजना रामदास उन्हाळे (वय ३५, रा. हिंगोली) हे किरकोळ जखमी झाले. तर सोना येथील प्रल्हाद जाधव (वय ३८)  कुंता प्रल्हाद जाधव …

हिंगोली: हट्टा-आडगाव मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; ६ जण जखमी

हट्टा, Bharat Live News Media वृत्तसेवा : हट्टा ते आडगाव दरम्यान पेट्रोल पंपासमोर भरधाव दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात  ६ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.३)  सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
रामदास उन्हाळे (वय ४२), अंजना रामदास उन्हाळे (वय ३५, रा. हिंगोली) हे किरकोळ जखमी झाले. तर सोना येथील प्रल्हाद जाधव (वय ३८)  कुंता प्रल्हाद जाधव (वय ३०)  मुलगा रुद्र प्रल्हाद जाधव (वय ४)  प्रद्युम्न प्रल्हाद जाधव (वय ८) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना परभणी येथील रूग्णालयात दाखल केले आहे.
अपघातामधील कुंता प्रल्हाद जाधव यांची पर्स विसरली होती. त्यात २७ हजार ७०० रुपये रोख रक्कम व एक सोन्याचा खडा होता. ही पर्स रुग्णवाहिका चालक ईश्वर मुटकुळे व डॉ. भानुदास पांचाळ यांनी रात्री अकराच्या सुमारास रुग्णांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली.  त्यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा 

हिंदू विवाह सोहळा नाचगाणे, खाणेपिणे आणि आर्थिक व्यवहाराचे साधन नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
हिंदू विवाह एक पवित्र संस्‍कार, नाच-गाण्याचा कार्यक्रम नाही : घटस्फोटप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाची टिप्पणी
हिंगोली: गोळेगाव येथील तरुणाचा कालव्यात बुडून मृत्यू