संविधान कुणाच्या बापालाही बदलता येणार नाही : देवेंद्र फडणवीस
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : संविधानाचा मूळ गाभा कुणालाही बदलता येत नाही आणि हे कुणाच्या बापालाही शक्य नाही, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेवर बोलताना दिले. विरोधक वारंवार हा आरोप करीत जनतेत गैरसमज निर्माण करत आहेत. या आरोपांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. Devendra Fadnavis
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी संविधान दिनानिमित्त आयोजित ‘संविधान सन्मान महासभे’त अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सध्याचे सरकार संविधान बदलू इच्छित असल्याचा आरोप केला. Devendra Fadnavis
आंबेडकरांच्या या वक्तव्यावर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नागपुरातील विविध कार्यक्रमासाठी फडणवीस आज आले होते. प्रकाश आंबेडकर हे बॅरिस्टर आहेत आणि त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की, भारताच्या संविधानाचा मूळ गाभा कुणालाच बदलता येत नाही. कुणालाच म्हणजे कुणालाच नाही.
संविधानात तशी तरतूदच नाही. त्यामुळे संविधान बदलणार हा एक निवडणुकीतील जुमला आहे. कुणाचाही बाप संविधान बदलू शकणार नाही. निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात. अर्ध्या लोकांचे ‘संविधान बदलणार’ असे सुरू होते, तर अर्ध्या लोकांचे ‘मुंबई तोडणार’ असे चालू होते. आता हे वारंवार ऐकावे लागेल. पण मुंबई कुणी तोडू शकत नाही, संविधान कुणी बदलू शकत नाही, असे फडणवीस ठामपणे म्हणाले.
हेही वाचा
Devendra Phadanavis : देवेंद्र फडणवीस यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन
केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरच रोष कसा : आमदार खोपडे
Supriya Sule: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : सुप्रिया सुळे
The post संविधान कुणाच्या बापालाही बदलता येणार नाही : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : संविधानाचा मूळ गाभा कुणालाही बदलता येत नाही आणि हे कुणाच्या बापालाही शक्य नाही, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेवर बोलताना दिले. विरोधक वारंवार हा आरोप करीत जनतेत गैरसमज निर्माण करत आहेत. या आरोपांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. Devendra Fadnavis वंचित बहुजन …
The post संविधान कुणाच्या बापालाही बदलता येणार नाही : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.