डायल ११२ क्रमांकावर पत्नीची हत्या केल्याची दिली खोटी माहिती

अकोला ; पुढारी वृत्तसेवा : खदान पोलिस स्टेशन हद्दीतील ख्वाजा अजमेरी उर्दू हायस्कूल सिंधी कॅम्प येथे पत्नीची हत्या केल्याची खोटी माहिती डायल ११२ क्रमांकावर दिली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती ही माहिती खोटी असल्याने आरोपीविरूध्द्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील इसमाचे नाव देवराव साठे (रा. सिंधी कॅम्प, खदान ) असे आहे. संबंधित बातम्या  Lok Sabha …

डायल ११२ क्रमांकावर पत्नीची हत्या केल्याची दिली खोटी माहिती

अकोला ; Bharat Live News Media वृत्तसेवा : खदान पोलिस स्टेशन हद्दीतील ख्वाजा अजमेरी उर्दू हायस्कूल सिंधी कॅम्प येथे पत्नीची हत्या केल्याची खोटी माहिती डायल ११२ क्रमांकावर दिली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती ही माहिती खोटी असल्याने आरोपीविरूध्द्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील इसमाचे नाव देवराव साठे (रा. सिंधी कॅम्प, खदान ) असे आहे.
संबंधित बातम्या 

Lok Sabha Election 2024 : अखेर बृजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट, मुलगा करणभूषणला भाजपचे तिकीट
Nashik News | चक्क भुजबळांच्या सहायकाला ऑनलाइन पन्नास हजाराची टोपी, संशयिताला सिनेस्टाईल अटक
मंदिराच्या दारामध्ये भक्ती तोडणार नाही…; उद्धव ठाकरे यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

२९ एप्रिल रोजी खदान पोलिस कर्तव्यावर असताना देवरात साठे याने मोबाईल फोनवरून नऊ इसमासोबत मिळून ख्वाजा अजमेरी उर्दू हायस्कूल सिंधी कॅम्प येथे पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली होती. यानंतर फिर्यादी पोलिस अंमलदार देवेंद्र श्रीकृष्ण चव्हाण याना एमडीटीवर माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी भेट दिली आणि चौकशी केली.
सुरूवातीला देवरात साठे याने पोलिसांना उडवा उडवीची, असमाधानकारक उत्तरे दिली. नंतर मात्र, स्वत : च मोबाईलवरून डायल ११२ क्रमांकावर फोन केल्याचे सांगितले. तसेच सदर ठिकाणी पाहणी केली असता, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे दिसून आले.
साठे याने पोलिसांना शासकीय कर्तव्य करीत असताना मोबाइलवरून कॉल करून त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याने त्याच्याविरुध्द खदान पोलिस स्टेशनमध्ये कलम १८२ भारतीय दंड संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.