सोलापूरात १० हजारांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूरात १० हजारांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद कांबळे व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
या बाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की तक्रारदार यांच्याकडे दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस हवालदार प्रमोद कांबळे यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १० हजार रुपये लाच रककम स्विकारताना झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे यांच्या मार्फत पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
The post सोलापूरात १० हजारांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद कांबळे व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या बाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की तक्रारदार यांच्याकडे दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस हवालदार प्रमोद कांबळे यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी …

The post सोलापूरात १० हजारांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Go to Source