कर्नाटक- तुमकूर येथे एकाच कुटुंबातील ५ जणांनी जीवन संपवले, व्हिडिओतून सांगितले कारण
पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील (Karnataka) तुमकूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एकाच कुटुंबातील ५ जणांनी जीवन संपवले आहे. मृतांमध्ये दाम्पत्य आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत.
त्यांनी कर्जबाजारीपणा आणि त्यातून झालेला छळ यामुळे जीवन संपवल्याचे त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि स्वत: तयार केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचे तुमकूरचे पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले.
गरीब साब, त्यांची पत्नी सुमैया, मुलगी हाजिरा आणि मुलगा मोहम्मद शाभान आणि मोहम्मद मुनीर अशी मृतांची नावे आहेत. कर्जबाजारीपणा आणि कथित छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने तुमकूर शहरात खळबळ उडाली आहे.
मृत कुटुंबीयाने त्यांच्यात इमारतीत राहणारा व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याच्या कुटुंबाचा कसा छळ केला आणि टोकाचे पाऊल उचलले हे व्हिडिओमधून स्पष्ट केले आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, पाच जणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहेत. या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Karnataka)
हे हे वाचा :
Houthi Fired On USA Ship : ‘हुथी’ दहशतवाद्यांचा युद्धनौकेवर हल्ला; अमेरिकन लष्कराचा दावा
अमेरिकेत पॅलेस्टिनी वंशाच्या तीन तरुणांवर गोळीबार
कोल्हापूर : टोप येथे एसटी बसला अपघात; १५ प्रवासी जखमी
The post कर्नाटक- तुमकूर येथे एकाच कुटुंबातील ५ जणांनी जीवन संपवले, व्हिडिओतून सांगितले कारण appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील (Karnataka) तुमकूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एकाच कुटुंबातील ५ जणांनी जीवन संपवले आहे. मृतांमध्ये दाम्पत्य आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यांनी कर्जबाजारीपणा आणि त्यातून झालेला छळ यामुळे जीवन संपवल्याचे त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि स्वत: तयार केलेल्या व्हिडिओतून …
The post कर्नाटक- तुमकूर येथे एकाच कुटुंबातील ५ जणांनी जीवन संपवले, व्हिडिओतून सांगितले कारण appeared first on पुढारी.