मोठी बातमी : दिल्ली महिला आयोगाच्या 223 कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द, नायब राज्‍यपालांचा आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली महिला आयोगाच्या 223 कर्मचाऱ्यांची मंजुरीशिवाय करण्‍यात आलेली नियुक्ती नायब राज्‍यपाल विनय कुमार सक्सेना यांनी रद्द केली आहे.  त्‍यांच्‍या आदेशानुसार दिल्ली महिला आयोगातील 223 कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावरून काढून टाकण्यात आले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन त्यांची परवानगी न घेता नियुक्ती केल्याचा आरोप आहे. नायब …

मोठी बातमी : दिल्ली महिला आयोगाच्या 223 कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द, नायब राज्‍यपालांचा आदेश

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली महिला आयोगाच्या 223 कर्मचाऱ्यांची मंजुरीशिवाय करण्‍यात आलेली नियुक्ती नायब राज्‍यपाल विनय कुमार सक्सेना यांनी रद्द केली आहे.  त्‍यांच्‍या आदेशानुसार दिल्ली महिला आयोगातील 223 कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावरून काढून टाकण्यात आले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन त्यांची परवानगी न घेता नियुक्ती केल्याचा आरोप आहे.
नायब राज्‍यपाल विनय कुमार सक्सेना यांनी जारी केलेल्‍या आदेशात महिला आयोगात केवळ ४० पदे मंजूर असल्याचे म्हटले आहे. दिल्‍ली महिला आयाेगाच्‍या  कर्मचाऱ्यांना करारावर घेण्याचा अधिकार नाही.
दिल्ली महिला आयोग विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी जारी केलेल्या या आदेशात असेही म्हटले आहे की, नवीन नियुक्त्यांपूर्वी अत्यावश्यक पदांचे कोणतेही मूल्यमापन करण्यात आले नव्हते. अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्यासाठी परवानगीही घेण्यात आली नव्हती. दिल्ली महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालीवाल या आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी यावर्षी ५ जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

223 employees from the Delhi Women Commission have been removed with immediate effect on the order of Lieutenant Governor VK Saxena. It is alleged that the then chairperson of the Delhi Women Commission, Swati Maliwal, had appointed them without permission, going against the… pic.twitter.com/wMZmaTuX9l
— ANI (@ANI) May 2, 2024