पंतप्रधान मोदींच्या विरोधात मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला लोकसभा लढवणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या कॉमेडीने सगळ्यांना हसवणारा कॉमेडियन श्याम रंगीला आता राजकारणात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. आपण लवकरच वाराणसीत येणार असून उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार याची माहिती देणार असल्याचे त्यांने यावेळी सांगितले. आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ …

पंतप्रधान मोदींच्या विरोधात मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला लोकसभा लढवणार!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आपल्या कॉमेडीने सगळ्यांना हसवणारा कॉमेडियन श्याम रंगीला आता राजकारणात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. आपण लवकरच वाराणसीत येणार असून उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार याची माहिती देणार असल्याचे त्यांने यावेळी सांगितले.
आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत श्याम रंगीला म्हणाला, “मी माझ्या मनातलं बोलायला आलो आहे. तुमच्या मनात प्रश्न आहे की, आपण ज्या बातम्या ऐकतोय ते खरं आहे का? हा विनोद आहे का?” कॉमेडियन जरूर विनोद करत असेल पण हा विनोद नाही, मी वाराणसीतून आणि मोदीजींच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.
लोकशाही जीवंत राहावी यासाठी मी हे करत असल्याचे मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला यांने सांगितले. तो म्हणाले की, आजकाल कोण उमेदवारी कधी मागे घेईल हे कोणीच सांगू शकत नाही. 29 वर्षीय श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीमुळे प्रसिद्धीझोतात आला.
पुढे श्याम रंगीला म्हणाला, ‘आम्ही इथे लोकशाही वाचव्यासाठी आलो आहे. येथे लोकांना मतदानाचा पर्याय मिळेल. सुरत आणि इंदूरसारखी परिस्थिती येथे होणार नाही. इंदूर आणि सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली आहेत. सुरतमध्ये भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय इंदूरमध्ये आता कोणतीही लढत नाही आणि फक्त छोटे पक्ष किंवा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

वाराणसी मैं आ रहा हूँ…#ShyamRangeelaForVaranasi pic.twitter.com/8BOFx4nnjn
— Shyam Rangeela (@ShyamRangeela) May 1, 2024

हेही वाचा :

Heat Wave Alert : बिहार, झारखंडसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा रेड अलर्ट
Pushpa 2 The Rule : अल्लू अर्जुनचे पहिले सिंगल ‘पुष्पा पुष्पा’ गाणे रिलीज
मुंबईचे रणांगण आखले : सहा मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट

Go to Source