नागपूर : फडणवीस म्हणाले, उद्धवजी मग मी नागपुरी !

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा उद्धव ठाकरे यांना समोर पराभव दिसत असल्यामुळेच त्यांची शिवराळ भाषा सुरू झाली. मात्र त्यांनी काहीही भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही. आता त्यांच्यासोबत जाणार नाही, रोज त्यांच्या बोलण्यातून निराशा दिसून येते. ते हताश झाले आहेत, मुद्दे नसल्याने टीका करत आहेत. मी नागपूरचा आहे, लक्षात ठेवा, त्यांच्यापेक्षा खाली जाऊन मला …

नागपूर : फडणवीस म्हणाले, उद्धवजी मग मी नागपुरी !

नागपूर : Bharat Live News Media वृत्‍तसेवा उद्धव ठाकरे यांना समोर पराभव दिसत असल्यामुळेच त्यांची शिवराळ भाषा सुरू झाली. मात्र त्यांनी काहीही भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही. आता त्यांच्यासोबत जाणार नाही, रोज त्यांच्या बोलण्यातून निराशा दिसून येते. ते हताश झाले आहेत, मुद्दे नसल्याने टीका करत आहेत. मी नागपूरचा आहे, लक्षात ठेवा, त्यांच्यापेक्षा खाली जाऊन मला बोलता येते. प्रगल्भ राजकारण्यांनी असे वक्तृत्व करू नये असा सबुरीचा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
नारायण राणे शिवसेनेचे अधिक जवळ होते. त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंबाबत अधिक माहिती आहे. आपल्या अनुभवातून ते बोलले असतील असे एका प्रश्नाचे उत्तरात फडणवीस म्हणाले. मलाही त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येते असा इशाराही फडणवीस यांनी दिला. मुंबईत भाजप व शिवसेनेच्या तीन-तीन जागांचा फॉर्म्युला ठरला होता. सुरुवातीला दक्षिण मुंबईची जागा आम्ही लढावी म्हणून तयारी देखील केली होती असे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे पाठीशी होते. त्यामुळे मला काही करणे शक्य झाले नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पश्चिम महाराष्ट्राच्या निवडणूक दौऱ्यावरून आल्यानंतर ते बोलत होते.
हेही वाचा :

अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचे साईड इफेक्ट; ब्रिटिश कंपनीची कबुली

‘किस्सा कुर्सी का’ ते ‘नायक’, दाहक राजकीय वास्तवावर चित्रपटांतून भाष्य

Delhi Bomb Threat : दिल्लीतील १०० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी