संतापजनक! घरून डबा घेण्याचा बहाणा; शाळकरी मुलीचा लैंगिक छळ
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शाळेतील मेकर स्पेस वर्कशॉपकरिता साहित्य खरेदीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला रविवार पेठेत नेले. त्यानंतर घरून डबा घेण्याच्या बहाण्याने घरी नेऊन एकाने लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या लायब्ररीमध्ये काम करणार्या मंगेश गायकवाड (रा. सेवानंद सोसायटी, बॅरिस्टर गाडगीळ रस्ता, सदाशिव पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 29 एप्रिल रोजी दुपारी बारा ते अडीचच्या सुमारास घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सोळा वर्षांची आहे. ती पुण्यातील नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे, तर आरोपी लायब्ररीमध्ये काम करतो. शाळेतील मेकर स्पेस वर्कशॉपकरिता साहित्य खरेदी करण्याकरिता आरोपी मुलीला रविवार पेठेत घेऊन गेला. वर्कशॉपचे साहित्य खरेदी करून परत येत असताना त्याचा जेवणाचा डबा घेण्याचा बहाणा त्याने केला. त्यानंतर तिला राहत्या घरी घेऊन जाऊन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधत तिचा लैंगिक छळ केला. मुलीने त्याला, ’तुम्हाला बायको, बाळ आहे,’ असे सांगूनही त्याने, ’बायको असली म्हणून काय झाले माणसाला फिलिंग असतात’, असे म्हणत हा घृणास्पद प्रकार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकारानंतर मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
हेही वाचा
US Campus Protests : कोलंबिया विद्यापीठातील पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थ्यांवर मोठी कारवाई
पेराची सीईटी 24, 25 व 26 मे रोजी..!
तंत्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यायचाय? मग कागदपत्रे तयार ठेवा!