दिल्लीतील १०० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे ईमेल आले आहेत. १०० हून अधिक शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये डीपीएस, एमिटी, मदर मेरी स्कूलसह अनेक मोठ्या शाळांचा समावेश आहे.
दिल्लीतील द्वारका येथे असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलला (डीपीएस) बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पूर्व दिल्लीतील मयूर विहार येथील मदर मेरी स्कूलमध्येही बॉम्बची धमकी मिळाली आहे. त्याचबरोबर पुष्प विहार येथील संस्कृती स्कूल आणि एमिटी स्कूललाही ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. छावला येथील सेंट थॉमस, सरिता विहारचे जीडी गोएंका, बाबा हरिदास नगरचे एव्हरग्रीन पब्लिक स्कूल आणि द्वारकाच्या सचदेवा ग्लोबल स्कूललाही धमक्या मिळाल्या आहेत.
दिल्लीशिवाय नोएडाच्या दिल्ली पब्लिक स्कूललाही धमकीचा ईमेल आला आहे. त्यानंतर पोलीस आणि शाळा प्रशासन सतर्क झाले. ज्या शाळांमध्ये धमक्या आल्या त्या शाळांमधून खबरदारी म्हणून मुलांना बाहेर काढण्यात आले. पोलीस, बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. शाळांकडून पालकांना संदेश पाठवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवत आहोत. शक्य तितक्या लवकर तुमच्या मुलाला शाळेच्या आवारातून संबंधित गेटवरून घरी नेण्याची व्यवस्था करा, असे संदेशात सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
‘नेमकी निवडणुकीच्या आधीच केजरीवालांना अटक का?’
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस आमदाराच्या पीएसह एकाला अटक
‘आप’ला दिलासा नाहीच..! सिसोदियांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला