साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा ; तरुणीचे अपहरण

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; येथील दहिवेल रत्यालगत सरस्वतीनगर येथे रात्री अकराच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह अधिका-यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत दरोडेखोरांचा … The post साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा ; तरुणीचे अपहरण appeared first on पुढारी.
#image_title

साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा ; तरुणीचे अपहरण

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; येथील दहिवेल रत्यालगत सरस्वतीनगर येथे रात्री अकराच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह अधिका-यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत दरोडेखोरांचा शोध घेणे सुरू केले आहे.
दरोडयासोबतच तरुणीचे अपहरण केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासोबतच तरुणीला सुरक्षित परत आणण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. याघटने बाबत ज्योत्स्ना नीलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दहिवेल रस्त्यालगत विमलबाई पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या ज्योत्स्ना पाटील यांच्या घरी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडेखोर घरात शिरले. ज्योस्ना पाटील यांचे पती नीलेश पाटील काही कामानिमित बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी त्यांच्यासोबत साक्रीतच राहणाऱ्या त्यांच्या भाचीला बोलावले होते. दरोडेखोरांनी घरात प्रवेश केल्यानंतर झटापट करत, तोंड हाताने दाबत तसेच त्यांच्याकडील लहान बंदूक व अन्य धारधार शस्त्राचा धाक दाखवत अंगावरील कानातील सोन्याचे काप, पट्टीची माळ, मणी-मंगळसूत्र, अंगठी, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण असे एकूण 88 हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतल्याचे ज्योत्स्ना पाटील यांनी पोलिसांनी सांगितले. ऐवज हिसकावल्यानंतर हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून मागील रुममध्ये लोटले व त्यांच्या 23 वर्षीय भाचीला घेऊन पळून गेल्याचेदेखील त्यांनी सांगितले. दरोडेखोर पसार झाल्यानंतर काही वेळानंतर ज्योत्स्ना पाटील यांनी कसेबसे हात सोडवून खिडकीची काच उघडत आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला व त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
श्वानपथक, ठसेतज्ञ दाखल
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरवात केली. यानंतर श्वानपथक, ठसेतज्ञ यांना रात्रीच बोलावून नमुने घेण्यात आले व शहरातून बाहेर पडणाऱ्या आजूबाजूला सर्व रस्त्यांनी दरोडेखोराचा शोध सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पिंपळनेरचे सपोनि श्रीकृष्ण पारधी हे देखील पथकासह रात्रीच घटनास्थळी पोचत त्यांनी देखील शोध सुरू केला. पोलिसांच्या पथकासह शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्यासह स्थानिक सामाजिक कार्यकत्यांनी देखील रात्रीच स्वतःच्या वाहनांनी दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हेदेखील सकाळी लवकर घटनास्थळी पोचले असून, त्यांनीदेखील सर्व माहिती घेऊन लगतच्या जिल्ह्यातील पोलिसप्रमुखांशी बोलत तपास सुरू केला आहे.
विविध शक्यतांची पडताळणी
▪️या घटनेत दरोड्यासोबतच तरुणीचे अपहरणदेखील करण्यात आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले असून,या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
▪️पोलिसांनीदेखील यातील गांभीर्य लक्षात घेत लागलीच शोधमोहीम सुरू करत तपासाला गती दिली असून, विविध शक्यता पडताळून तपास करण्यात येत आहे.
——————

दरोड्यासोबतच तरुणीच्या अपहरणाची घटना अतिशय गंभीर असून,पोलिसांनी सर्व शक्यतांचा विचार करून तपासला गती दिली आहे. काही सीसीटीव्ही फुटेज व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व बाजूकडीत रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. लगतच्या जिल्ह्यातील पोलिसांनादेखील घटनेची माहिती देत तपास करण्यात येत आहे.पोलिसांची चार पथके शोध घेत असून, दरोडेखोरांचा शोध घेण्यासोबतच तरुणीला सुरक्षित परत आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल,-साजन सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, साक्री
 
तरुणीला शोधण्यात पोलिसांना यश
दरम्यान, येथील दरोडा प्रकरणातील अपहरण करण्यात आलेल्या तरुणीला शोधण्यात पोलिसांना यश आले असून, (सेंधवा)मध्य प्रदेश येथे साक्री पोलिसांच्या पथकाला ती सापडल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांनी दिली. तरुणीला लवकरात लवकर साक्री येथे आणल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊन आरोपीदेखील जेरबंद होतील, अशी माहिती बोलताना सोनवणे यांनी दिली.
The post साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा ; तरुणीचे अपहरण appeared first on पुढारी.

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; येथील दहिवेल रत्यालगत सरस्वतीनगर येथे रात्री अकराच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह अधिका-यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत दरोडेखोरांचा …

The post साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा ; तरुणीचे अपहरण appeared first on पुढारी.

Go to Source