कोल्हापूर : कसबा वाळवे येथे पशुवैद्यकीय परिचारकाने जीवन संपविले
कसबा वाळवे: Bharat Live News Media वृत्तसेवा : कसबा वाळवे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारक अमर विलास आयरे (वय ५४) यांनी दवाखान्यातील राहत्या कॉर्टर्समध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपविले. आज (दि.३०) सकाळी ही घटना उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, परिचारक अमर आयरे (मुळगाव, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) हे मागील बारा ते पंधरा वर्षे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचर म्हणून सेवेत आहेत. मागील दहा वर्षांपासून ते दवाखान्यातील क्वार्टर्समध्ये पत्नी व मुलासह राहत आहेत.
आज सकाळी घरी कोणी नसताना त्यांनी स्लॅबच्या लोखंडी हुकाला नायलॉनची रस्सी बांधून जीवन संपविले. या घटनेमागचे नेमके कारण समजलेले नाही. याबाबतची फिर्याद आयरे यांचे मेहुणे गजानन कृष्णा भोई (रा. गारगोटी) यांनी राधानगरी पोलिसांत दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा
कोल्हापूर : कळे-गगनबावडा रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू; निधी वर्ग
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह मोबाईल प्रकरण : 2 तुरुंगाधिकारी, 9 कर्मचारी बडतर्फ
कोल्हापूर : विहिरीत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू