वडील असलो तरी अमोलविरोधात प्रचार करणार : गजानन कीर्तिकर
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात आपण मुलगा अमोलविरोधात निवडणुकीत प्रचार करणार, असा इशारा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिला आहे. आपण राजधर्माचे पालन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाकडे असलेल्या या जागेवर ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर खा. कीर्तिकर म्हणाले, अमोल माझा मुलगा आहे. त्यामुळे मी त्याच्याविरोधात निवडणूक लढणार नसल्याचे मी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्पष्ट केले होते. पण तो माझा मुलगा असला तरी मी महायुतीच्याच उमेदवारासाठी काम करेन.