कन्नड घाटात वाहन कोसळलं, चौघे ठार
पुढारी ऑनलाइन डेस्क ; चाळीसगाव येथील कन्नड घाटात देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. गाडी थेट दरीत कोसळली असून या अपघातामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
कन्नड घाटात मध्यरात्री तवेरा व अन्य वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले. कन्नड घाटातून जात असतांना एमएच ४१ व्ही ४८१६ या क्रमांकाच्या तवेरा गाडीचा अन्य वाहनासोबत जोरदार अपघात झाला. या भीषण अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के, (वय -६५); शिलाबाई प्रकाश शिर्के, (वय -६० ) ; वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी, (वय -३५) आणि पूर्वा गणेश देशमुख, (वय -०८) हे चार प्रवासी जागीच मयत झाले.
एमएच ४१ व्ही ४८१६ क्रमाकांच्या वाहनाने अक्कलकोट दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना कन्नड घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. दाट धुके आणि अंधार यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट दरीत कोसळून हा अपघात झाला.
या अपघातात गणेश देशमुख,वय ३०; अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०); कृष्णा वासुदेव शिर्के, (वय -४); जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी,( वय १७ ); सिध्देश पुरुषोत्तम पवार( वय १२ ) ;.पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय -३५) आणि अभय पोपटराव जैन, (वय ५०) हे सात जण जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, वाहनधारकांनी कन्नड घाटातून अतिशय सुरक्षितपणे वाहने चालविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
The post कन्नड घाटात वाहन कोसळलं, चौघे ठार appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाइन डेस्क ; चाळीसगाव येथील कन्नड घाटात देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. गाडी थेट दरीत कोसळली असून या अपघातामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. कन्नड घाटात मध्यरात्री तवेरा व अन्य वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले. कन्नड घाटातून …
The post कन्नड घाटात वाहन कोसळलं, चौघे ठार appeared first on पुढारी.