पंत-सॅमसनमध्ये कोण भारी? जाणून घ्या दोघांची टी-20 आकडेवारी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपला संघ जाहीर केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या दोघांनाही भारतीय संघात संधी मिळाली आहे. पंतने 22 नोव्हेंबर 2022 रोजी शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या दोन यष्टीरक्षक फलंदाजांच्या टी-20 क्रिकेटच्या आकडेवारीची एक नजर टाकूया.
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पंड्या उपकर्णधार, सॅमसन-दुबेला संधी
पंत-सॅमसनने किती आंतरराष्ट्रीय सामने खेळले?
पंतने 2017 मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये तो 22.43 च्या सरासरीने आणि 126.54 च्या स्ट्राइक रेटने 780 धावा करण्यात यशस्वी झाला आहे. यादरम्यान, त्याच्या नावावर 3 अर्धशतकांची नोंद आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 65 आहे. पंतने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 27 झेल घेतले आहेत आणि 9 स्टंपिंग देखील केले आहेत. (T20 World Cup 2024)
सॅमसनने 2015 मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 18.70 च्या सरासरीने आणि 133.09 च्या स्ट्राइक रेटने 374 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटमधून फक्त 1 अर्धशतक झळकले आहे. यष्टिरक्षक म्हणून त्याने 11 सामन्यांमध्ये एकूण 10 बळी घेतले आहेत. ज्यामध्ये 2 स्टंपिंगचाही समावेश आहे.
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंग्लंडची घोषणा, ‘या’ 15 खेळाडूंना मिळाले स्थान
टी-20 क्रिकेटमधील दोन्ही खेळाडूंची आकडेवारी
पंतने त्याच्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीत 190 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 32.10 च्या सरासरीने आणि 145.90 च्या स्ट्राइक रेटने 4,752 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने 2 शतके आणि 25 अर्धशतके फटकावली आहेत. दुसरीकडे, सॅमसनने आतापर्यंत 266 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 29.35 च्या सरासरीने आणि 134.65 च्या स्ट्राइक रेटने 6,575 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर 3 शतके आणि 44 अर्धशतकांची नोंद आहे.
दोघांची आयपीएल कारकिर्दीवर कशी आहे?
पंतने आतापर्यंत आयपीएलमध्ये 109 सामने खेळले आहेत. यातील 108 डावांमध्ये त्याने 35.56 च्या सरासरीने आणि 149.19 च्या स्ट्राइक रेटने 3,236 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 18 अर्धशतके झळकावली आहेत. सॅमसंगने आयपीएलमध्ये आतापर्यंत 161 सामने खेळले आहेत. या कालावधीत, त्याने 30.96 च्या सरासरीने आणि 139.05 च्या स्ट्राइक रेटने 4,273 धावा काढल्या आहेत. त्याने 3 शतके आणि 24 अर्धशतके फटकावली आहेत. (T20 World Cup 2024)