श्रीरंग बारणे यांच्या रॅलीदरम्यान अनर्थ टळला

पनवेल : पुढारी वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, यांच्या कामोठे येथील बाईक रॅली दरम्यान उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे भगवा झेंडा जळून त्याचे तुकडे बारणे यांच्या गाडीवर पडले. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी सुरक्षित ठिकाणी नेल्यामुळे अनर्थ टळला. कामोठे वसाहतीमध्ये रविवारी श्रीरंग बारणे यांच्या स्वागत, बाईक रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते, ही …

श्रीरंग बारणे यांच्या रॅलीदरम्यान अनर्थ टळला

पनवेल : Bharat Live News Media वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, यांच्या कामोठे येथील बाईक रॅली दरम्यान उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे भगवा झेंडा जळून त्याचे तुकडे बारणे यांच्या गाडीवर पडले. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी सुरक्षित ठिकाणी नेल्यामुळे अनर्थ टळला.
कामोठे वसाहतीमध्ये रविवारी श्रीरंग बारणे यांच्या स्वागत, बाईक रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते, ही रॅली कामोठे सेक्टर 7 एम एन आर शाळेच्या चौकात आली असता बारणे यांचे स्वागत करण्यात आले. उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. या चौकात शिवजयंती निमित्ताने भला मोठा भगवा झेंडा लावलेला होता. काही फटाके या भगव्या झेंड्यावर पडले. त्याचे तुकडे बारणे यांच्या गाडीवर पडलेच. शिवाय एक तुकडा टायरला जाऊन चिकटला. चालकाने गाडी सुरक्षित ठिकाणी नेऊन बारणे यांना बाहेर काढले.