भाजपाचे 25 ते 30 नगरसेवक आमच्या संपर्कात : जयश्री महाजन
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- जळगाव शहरातील अनेक भाजपचे नगरसेवक हे आमच्या संपर्कात असून गुप्त बैठकांमध्ये ते त्यांच्या मनातील गोष्ट बोलून दाखवत असल्याचा दावा ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. महाजन यांनी केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीचे माघारी नंतर चित्र स्पष्ट झालेले असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जळगाव मधील अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. ते तणाने आमच्या सोबत नसले तर मनाने आहेत.
निवडणुकीच्या काळात होणाऱ्या गुप्त बैठकांमध्ये ते मनातील बोलून दाखवत आहे. आम्ही उद्धव ठाकरे गटाचे काम करत असल्याचे ते सांगत असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. भाजपात सुरू असलेल्या हुकूमशाहीला ते कंटाळलेले आहेत. हे कुठेतरी थांबावे यासाठी ते आमच्या संपर्कात आहेत. एक दोन नाही तर 25 ते 30 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा महापौर जयश्री महाजन यांनी केला आहे.
हेही वाचा –
विद्यापीठ होणार ‘ऑक्सफर्ड ऑफ द सेंटर आशिया’
Dhule News | स्वीप उपक्रमातंर्गत आयोजित ‘वोट कर धुळेकर’ महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Heat Wave Alert | उष्माघाताचा धोका वाढला! राज्यातील ‘या’ भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा