Bharat Live News Media ऑनलाईन : उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १ मे रोजी ठाणे, रायगड, अहमनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेची लाट राहणार आहे तर. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण आणि आर्द्रता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Heat Wave Alert)
मुंबई आणि उपनगरात पुढील २४ तासांसाठी आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८ अंश सेल्सियस आणि २७ अंश सेल्सियसच्या आसपास असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ४४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुणे येथे २२.४ अंश सेल्सियस हे सर्वात कमी किमान तापमान होते.
पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे; सौराष्ट्र, बिहार, ओडिशाचा काही भाग तसेच झारखंड, तेलंगणा, कर्नाटकचा अंतर्गत भाग, केरळचा उत्तर भाग, कोकण आणि रायलसीमामध्येही उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आहे. ओडिशामध्ये १५ एप्रिलपासून, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलपासून तीव्र उष्णतेची लाट असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
ओडिशातील काही भागात तसेच बिहार, पश्चिम बंगाल, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात रात्रीचे तापमान तीव्र उष्ण असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.
उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/wllbvKk1gX
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 30, 2024
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८°C आणि २७°C च्या आसपास असेल. pic.twitter.com/KBnyWpTNBh
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 30, 2024
हे ही वाचा :
देशभरात उष्णतेची लाट! ‘या’ राज्यांना रेड अलर्ट
हवामानाची ‘गुगली’..! काही राज्यांत पाऊस तर मैदानी राज्यात पारा @42