बहुमत असूनही आरक्षणाला हात लावला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेससह इंडिया आघाडीतील नेते आरक्षण बदलण्यावरून संभ्रम निर्माण करत आहेत. 2014 पासून बहुमत असूनही आरक्षण बदलाला हात लावला नाही. उलट आरक्षण कायम ठेवण्यास मी कटिबद्ध असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी …

बहुमत असूनही आरक्षणाला हात लावला नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेससह इंडिया आघाडीतील नेते आरक्षण बदलण्यावरून संभ्रम निर्माण करत आहेत. 2014 पासून बहुमत असूनही आरक्षण बदलाला हात लावला नाही. उलट आरक्षण कायम ठेवण्यास मी कटिबद्ध असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची सभा सोमवारी होम मैदानावर झाली. त्याप्रसंगी ते म्हणाले, दहा वर्षांत भाजप सरकारने मागास प्रवर्गासाठी अधिक कामे केली. काँग्रेसने 60 वर्षांत जाणूनबुजून मागास घटकांवर अन्याय केला. महाराष्ट्र सामाजिक न्यायाची भूमी आहे. शाहू, फुले, आंबेडकरांनी समता दिली. भाजपने मागासवर्गाला ताकद दिली. रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केले. केंद्रीय मंत्रिमंडळातील 60 टक्के मंत्री विविध घटकांतील आहेत.
सोलापुरात पद्मशाली परिवारात मी जेवण केले. त्यांच्या मिठाचे कर्ज मी चुकवत आहे. इंडिया आघाडीकडे व्हिजन नाही. केवळ मोदीला रोखणे हा हेतू त्यांचा आहे, यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख उपस्थित होते.
शिवरायांच्या आशीर्वादानेच स्वराज्य राबवता आलेः मोदी
कराड ः Bharat Live News Media वृत्तसेवा
दहा वर्षांपूर्वी भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर मी सर्वप्रथम रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले. छत्रपतींच्या आशीर्वादामुळेच मला देशभर स्वराज्य, सुशासन राबविण्याची संधी मिळाली, असे भावुक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कराड येथील जाहीर सभेत काढले.
सैदापूर-कराड येथे सातारा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. ‘कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या सातारकरांना माझा नमस्कार’, अशी मराठीत सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेकांनी मला सातार्‍यात येण्याची गरज नसल्याचे सांगितले. मात्र भगवा फडकवत ठेवणार्‍या छत्रपतींच्या सातार्‍यात तुमचे दर्शन व आशीर्वाद घ्यायला मी आलो. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे.
व्यासपीठावर उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे उपस्थित होते.