‘त्या’ नेत्यानं अश्वासन देऊनही पाणी पोहोचवलं नाही : मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंधरा वर्षांपूर्वी एक मोठा नेता येथे निवडणूक लढवण्यासाठी आला होता. त्यानंतर त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन टंचाईग्रस्त भागात पाणी पोहोचवण्याची शपथ घेतली. पण त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. आता त्या नेत्याची माढ्यातून लढण्याची हिंमत नाही, त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली.
