प्रियंका गांधी निवडणूक लढविण्‍यास अनुत्‍सुक?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या रणधुमाळीत उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. रायबरेलीतून प्रियंका गांधी यांच्‍या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका गांधी-वाड्रा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. प्रियांका गांधी केवळ निवडणुकीचा प्रचार करतील. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अमेठी किंवा रायबरेलीमधून …

प्रियंका गांधी निवडणूक लढविण्‍यास अनुत्‍सुक?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या रणधुमाळीत उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. रायबरेलीतून प्रियंका गांधी यांच्‍या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका गांधी-वाड्रा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे.
प्रियांका गांधी केवळ निवडणुकीचा प्रचार करतील. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अमेठी किंवा रायबरेलीमधून निवडणूक लढवतील यावर 24 तासांत अंतिम निर्णय घेतला जाण्‍याची शक्‍यता आहे.  काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अमेठी आणि रायबरेली उमेदवारी बाबत चर्चा केली. या बैठकीत उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसांसह काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पक्षाचे उमेदवार घोषित करावे, अशी मागणी झाली. मात्र राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून दुसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत.
प्रियांका का लढवणार नाहीत निवडणूक?
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2004 पासून रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्‍या. मात्र नुकतीच त्‍यांची राज्यसभेवर निवड झाली आहे.प्रियंका गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता होती. मात्र प्रियांका गांधी पुढील तीन दिवस निवडणूक कार्यक्रमात असतील. १ ते ३ मे रोजी या काळात आसाम, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचाराचे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्‍यामुळे स्वतःला एका मतदारसंघातील प्रचार गुंतण्‍यापेक्षा संपूर्ण राज्यात प्रचार करून पक्षासाठी प्रचार करण्‍यासाठी त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्‍याची चर्चा आहे.
हेही वाचा :

Pm Narendra Modi Sabha Pune : जो कहते हैं, वो करते हैं, वह मोदी हैं : मुख्यमंत्री शिंदे
Lok Sabha elections PM Narendra Modi | पीएम मोदींवर ६ वर्ष निवडणूक बंदीची मागणी, दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली