Pm Narendra Modi Sabha Pune : जो कहते हैं, वो करते हैं, वह मोदी हैं : मुख्यमंत्री शिंदे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ अशा पद्धतीने काम करणारे आहेत. ‘जो कहते है, वो करते है, वह मोदी है,’ त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे घोडदौड करत आहे. अनेक देशांचे प्रमुखही त्यांचे कौतुक करतात. राष्ट्राला महासत्ता करण्याचे वचनदेखील ते पूर्ण करतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Pm Narendra Modi Sabha Pune : जो कहते हैं, वो करते हैं, वह मोदी हैं : मुख्यमंत्री शिंदे

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ अशा पद्धतीने काम करणारे आहेत. ‘जो कहते है, वो करते है, वह मोदी है,’ त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे घोडदौड करत आहे. अनेक देशांचे प्रमुखही त्यांचे कौतुक करतात. राष्ट्राला महासत्ता करण्याचे वचनदेखील ते पूर्ण करतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी य उधळली.
पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी (दि.29) रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित आयोजित केलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीलाच शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनता आतुर असल्याचे सांगत मोदींच्या राज्यातील सर्वच सभा रेकॉर्डब्रेक होत असल्याचे नमूद केले.
प्राण जाए पर वचन न जाए अशी मोदींची कार्यपद्धती आहे. 370 कलम हटवून दाखवले. राममंदिर उभारले. मोदींच्या रक्तात देशभक्ती भिनलेली आहे. राष्ट्राला महासत्ता करण्याचे वचनदेखील ते पूर्ण करतील. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. या देशात मोदींची गॅरंटी चालते. या उलट काँग्रेसने साठ वर्षांत देश बुडविला. ही लढाई महायुती आणि महाविकास आघाडीमधील नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध परदेशात देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी यांच्यामध्ये आहे. देशाला विकासाकडे अग्रेसर करण्यासाठी महायुतीच्या चारही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शिंदे यांनी या वेळी केले.
हेही वाचा

‘इथे’ लग्नात बोलावले जातात भाडोत्री पाहुणे!
अजित पवार हे धमकी बहाद्दर, रोज लोकांना धमक्या देतात : संजय राऊत
छत्रपती संभाजीनगर : पुन्हा गॅस टँकरचा अपघात; सुदैवाने गॅस गळती नाही