सेन्सेक्सची ७५ हजाराला गवसणी, Nifty Bank नव्या शिखरावर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान मंगळवारी (दि.३० एप्रिल) भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी तेजीत सुरुवात केली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्सने ३०० अंकांनी वाढून ७५ हजारांच्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टी २२,७५० वर गेला. निफ्टी बँकने ४९,५५० च्या नव्या विक्रमी उच्चांकावर झेप घेतली. फायनान्सियल आणि ऑटो स्टॉक्सच्या तेजीचा बाजाराला सपोर्ट मिळाला आहे. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर एम अँड एम, मारुती, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. तर भारती एअरटेल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस हे शेअर्स किरकोळ घसरले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपही हिरव्या रंगात खुले झाले आहेत.
निफ्टीवर एम अँड एम, मारुती, एचडीएफसी लाईफ, बजाज ऑटो, हिरो मोटर्स हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, टायटन या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे. (Stock Market Updates)
हे ही वाचा :
गुंतवणूकदारांनो, KYC पूर्ण केलीय का? जाणून घ्या प्रक्रिया
वेध शेअर बाजाराचा : निवडणुकीच्या धामधुमीतही बाजारात तेजी