निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये पाच लाखांची रोकड जप्त
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी (दि. २९) पंचवटीमधील राहू हॉटेल परिसराजवळ कारवाई करत पाच लाखांची रोकड जप्त केल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे. नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचदरम्यान नाशिकच्या तहसीलदार शोभा पुजारी यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारानुसार पेठ रोडवर सापळा रचण्यात आला. यावेळी सायंकाळी सातच्या सुमारास एका वाहनातून पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून याबाबतची कारवाई सुरू हाेती. दरम्यान, निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखविले जाते. त्यासाठी पैसे, मद्य, निरनिराळ्या वस्तूंचा वापर केला जातो. मात्र, या घटना आचारसंहितेच्या कचाट्यात येत असल्याने त्या राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांच्या नेतृत्वात पथके तयार केली आहेत. तसेच विविध महामार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तसेच पथकांकडूनही वॉच ठेवला जात आहे.
हेही वाचा –
नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल
सिंधुदुर्ग : रायगड-खोपोली येथील दरोडा प्रकरणातील तिघांना सावंतवाडीत अटक
Amravati News : धक्कादायक! प्लॉटच्या वादातून शेजाऱ्याकडून आई व मुलाची हत्या; वडील गंभीर