नागपूर : एक दिवसीय बाळाची जमिनीवर आपटून हत्या; बापाला जन्मठेप
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : एक दिवसाच्या बाळाची जमिनीवर आपटून हत्या करणाऱ्या बापाला सोमवारी (दि.२९) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गिरीष गोंडाणे असे या क्रूरकर्मा बापाचे नाव असून जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख यांच्या कोर्टात ही शिक्षा सुनावण्यात आली.
अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना ३१ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजच्या सुमारास आरोपी गिरीष गोंडाणे हा मेडिकल रुग्णालयात वार्ड नंबर. ४६ येथे गेला. व आई प्रतीक्षा गोंडाणे हिच्याकडून बाळाला उचलून घेत हवेत फिरवत फरशीवर आपटले. यावेळेस बाळाची आई आणि सुरक्षा गार्ड उत्तरा या दोघी प्रत्यक्ष हजर होत्या. सुरक्षा गार्ड उत्तरा हिने अन्य सुरक्षा गार्डच्या मदतीने आरोपीला पकडले. यानंतर बाळाची आजी मेश्राम हिने याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास अधिकारी आनंदकुमार खंडारे यांनी प्रकरणाचा तपास करत आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. यानंतर अतिरिक्त सरकारी वकील क्रांती शेख (नेवारे) यांनी सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासले. सोमवारी (दि.२९) या प्रकरणाचा निकाल लागला.
हेही वाचा :
Amravati News : धक्कादायक! प्लॉटच्या वादातून शेजाऱ्याकडून आई व मुलाची हत्या; वडील गंभीर
कोल्हापूर : विहिरीत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू
नागपूर : आई वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून लहान भावाचा निर्घृण खून