राज्यात चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी २९८ उमेदवार रिंगणात
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३६९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील ७१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती सोमवारी (दि.२९) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : नंदुरबार ११, जळगाव १४, रावेर २४, जालना २६, औरंगाबाद ३७, मावळ ३३, पुणे ३५, शिरुर ३२, अहमदनगर २५, शिर्डी २०, बीड ४१ अशी आहे. या ११ मतदारसंघांमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे.
हेही वाचा :
रायगडमधील ‘ते’ तीन आमदार ‘वंचित’च्या संपर्कात? कुमुदिनी चव्हाण यांचा गौप्यस्फोट
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे आर्थिक सबळ होण्यासाठी प्रयत्नशील: नारायण राणे
तर अरविंद केजरीवाल मतदानाचा अधिकार बजावण्यापासून वंचित राहणार