रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील भंगार डेपोला भीषण आग

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील आठवडा बाजार येथील भंगार डेपोला आज (दि.२९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. पत्र्याच्या कंपाऊंडमधून आगीचे लोळ बाहेर पडू लागल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी होती. महापालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत काही वेळात आग आटोक्यात आणली. शहरातील आठवडा …

रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील भंगार डेपोला भीषण आग

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील आठवडा बाजार येथील भंगार डेपोला आज (दि.२९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. पत्र्याच्या कंपाऊंडमधून आगीचे लोळ बाहेर पडू लागल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी होती. महापालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत काही वेळात आग आटोक्यात आणली.
शहरातील आठवडा बाजार येथे मोठा भंगार डेपो आहे. या डेपोला पत्र्याचे कंपाऊंड आहे. नेमका हा डेपो कोणाचा आहे, हे अजून उघड झालेले नाही. परंतु आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास या भंगार डेपोला अचानक आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररुप धारण केले. आगीचे लोळ पत्र्याच्या कंपाऊंड बाहेर पडू लागल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर स्थानिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. काही वेळातच पालिकेच्या अग्निशमन बंबासह एमआयडीसीचा आग्निशामन बंब घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. स्थानिक लोकप्रतिनिधी संजय साळवी, बिपिन बंदरकर यांच्यासह अनेक जण घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु आग कशामुळे लागली, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा :

नागपूर : किरकोळ कारणावरुन २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
जळगाव: साकेगाव बाळ चोरी प्रकरण; अनाथ आश्रमच्या संचालिकेसह ५ जणांना अटक
नागपूर : आई वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून लहान भावाचा निर्घृण खून