बोटावर शाई दाखवा, आरोग्य तपासणीत ५० टक्के सवलत मिळवा
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मतदान जनजागृतीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने बोटावर शाई दाखवा आणि तपासणीत सवलत मिळवा, असे अभियान हाती घेण्यात आले असून, याअंतर्गत शहरातील डॉक्टर त्यांच्या तपासणी शुल्कामध्ये मतदात्यांना ५० टक्के सवलत देणार आहेत. मतदानानंतर पुढील तीन दिवस मतदात्यांना याचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यात १३ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम सुरु करण्यात आले आहे. तसेच यासाठी खाजगी डॉक्टर्सही सरसावले आहेत. १३ तारखेला मतदान करून बोटांवरील शाई दाखवा आणि शहरातील कुठल्याही डॉक्टरांकडे तपासणी शुल्कामध्ये ५० टक्के सवलत मिळवा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोशिएशनने नागरिकांना तसेच मतदारांना केले आहे. हे अभियान १४, १५ आणि १६ मे असे सलग तीन दिवस चालणार आहे. यात शहरातील सुमारे दीड हजारांवर असलेल्या खाजगी डॉक्टरांकडे मतदारांना तपासणी शुल्कात सवलत पन्नास टक्के सवलत मिळणार आहे. फक्त यासाठी त्यांनी मतदान करणे आवश्यक आहे.
मतदात्यांना तपासणीत ५० टक्के सवलत
इंडियन मेडिकल असोसिएशनचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६०० डॉक्टर्स सभासद आहेत. या सर्व डॉक्टरांकडे मतदान करणाऱ्यांना मतदात्यांना तपासणी शुल्कात ५० ट्कके सवलत देण्यात येईल. जिल्ह्यात १३ मे रोजी मतदान आहे. त्यानंतर पुढील तीन दिवसांपर्यंत हे अभियान सुरु राहील.
– डॉ. उज्वला दहिफळे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन.
मतदान करुन लोकशाहीला समृद्ध करा
आयएमएने मतदार जनजागृतीसाठी बोटावर शाई दाखवा आणि तपासणीत सवलत मिळवा, असे अभियान सुरु केले आहे. यात मतदारांना डॉक्टरांकडे तपासणीत सवलत मिळेल. सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीला समृद्ध करावे.
-डॉ विकास देशमुख, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन
हेही वाचा
छ.संभाजीनगर : पाचोड पोलीस, जिल्हा बालविकास पथकाने बालविवाह रोखला
छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले
छ.संभाजीनगर: येसगावजवळ छोटा हत्ती – दुचाकीच्या धडकेत तरुण ठार, १ जण जखमी