नागपूर : किरकोळ कारणावरुन २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार तरुणांनी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रोहन देवीलालजी डांगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नंदकिशोर देविदास कुंभलकर, गौरव संजय कालेश्वरवार, राज मणिराम कुंटलवार व शुभम कमलकिशोर भेलेकर अशी चार संशयित आरोपींची नावे असल्याची माहिती आहे. …

नागपूर : किरकोळ कारणावरुन २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार तरुणांनी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रोहन देवीलालजी डांगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नंदकिशोर देविदास कुंभलकर, गौरव संजय कालेश्वरवार, राज मणिराम कुंटलवार व शुभम कमलकिशोर भेलेकर अशी चार संशयित आरोपींची नावे असल्याची माहिती आहे.
पारडी पोलीस ठाणे हद्दीतील, मानकरवाडी मैदान, भवानी येथे रोहन देवीलालजी डांगे त्याचा मित्र राज सुधीर रामटेके आणि आनंद योगीन्द्रनाथ पाठक तिघे सोबत गप्पा मारत बसले होते. संशयित आरोपी नंदकिशोर कुंभलकर, गौरव कालेश्वरवार, राज कुंटलवार, शुभम कमलकिशोर भेलेकर हे एका चार चाकी वाहनाने आले. दरम्यान क्षुल्लक कारणावरून त्यांचा रोहन सोबत वाद झाला. मात्र, आरोपींनी भांडणाचा राग मनात धरून रोहनला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळात हा वाद विकोपाला गेला असता आरोपींनी चाकुने रोहनच्या पोटावर, मानेवर, पाठीवर व छातीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर रोहनच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी तेथून पळून गेले. हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट पारडी पोलीस स्टेशन यांनी दिली.