बीड: लवुळ येथे मराठा तरुणांनी पंकजा मुंडेंची गाडी रोखली
माजलगाव: Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील लवुळ क्र. १ येथे बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना येथील मराठा सकल युवकांनी प्रचारासाठी गावात येताच त्यांची गाडी रोखली. यावेळी या युवकांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत पंकजा मुंडे यांना सभास्थळी नेण्यात आले.
लवुळ येथे पंकजा मुंडे यांची आज (दि.२९) सकाळी ११ वाजता सभा होती. सकाळपासूनच मराठा तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून होते. पंकजा मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा चौकात येताच युवकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी पंकजा मुंडे खाली उतरून सर्व युवकांना मराठा आरक्षणाबाबत आपला असलेला पाठिंबा याबाबत समजून सांगत होत्या. परंतु यावेळी सर्व युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुम्ही बॉण्डवर मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे, असे लिहून द्या, असा आग्रह केला. परंतु, त्यांनी बॉण्डवर लिहून देण्याचा आग्रहाला बगल दिली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मुंडे यांची गाडी सोडण्यात आली.
हेही वाचा
बीड : तलवाडा येथे ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार
बीड – पैठण उजवा कालवा फुटला, पाणीटंचाईत पाणी वाया
बीड: रांजणी येथे ६ हजारांची लाच मागणारा तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात