Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटाला आज ८ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने ‘या’ चित्रपटाची मुख्य नायिका रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. तिने सैराटला आज ८ वर्ष पुर्ण झाली…अशी कॅप्शन लिहिली आहे. शिवाय तीन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये ती खूप गोड हसताना दिसतेय. दुसऱ्या फोटोमध्ये परश्या आणि आर्ची यांचा शूटिंगच्या वेळचा फोटो आहे.
कॉमेंट्सचा पाऊस
इन्स्टावर नेटकऱ्यांनी या पोस्टवर कॉमेंट्सचा पाऊस पाडलाय. एका नेटकऱ्याने लिहिलंय-” मराठी चित्रपट जगताला वरच्या टोकावर नेण्याचा आणि मराठीची ताकद जगाला दाखवण्याचा नागराज मंजुयेचा सर्वोत्तम प्रयत्न होता. अजय अतुल यांनी आपल्या ज्ञानाने मराठी संगीत जगभर गाजवले. उमदा अभिनय पर्श्या अर्ची”. आणखी एका युजरने खट्याळपणे लिहिलंय- मराठीत सांगितलेले कळत नाही…इंग्लिश मद्ये सनगु 😂👏.
View this post on Instagram
A post shared by Rinku Asha Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)