ब्रेकिंग: तेलंगणाचे मुख्यमंत्री अडचणीत, दिल्ली पोलीसांकडून समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) च्या तेलंगणा युनिटने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट संपादित व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना समन्स बजावले. त्यांना बुधवार 1 मे रोजी दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत, या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. …

ब्रेकिंग: तेलंगणाचे मुख्यमंत्री अडचणीत, दिल्ली पोलीसांकडून समन्स

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) च्या तेलंगणा युनिटने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट संपादित व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना समन्स बजावले. त्यांना बुधवार 1 मे रोजी दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत, या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Amit Shah fake video case)
दिल्ली पोलिसांनी रेवंत रेड्डी यांना 1 मे रोजी त्याच्याद्वारे वापरलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससह चौकशीसाठी दिल्लीत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. गृह मंत्रालय आणि भाजपच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर एक दिवसांनी ही कारवाई  करण्यात आली आहे. (Amit Shah fake video case)
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांखाली आणि आयटी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, “सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असलेल्या समुदायांमध्ये असंतोष निर्माण करण्याच्या उद्देशाने” हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Amit Shah fake video case)

Fake video of Union Home Minister Amit Shah | Telangana CM Revanth Reddy has been summoned to appear before Delhi Police’s IFSO unit (Cyber Unit) on 1st May to join the investigation. He has been asked to appear with his mobile phone allegedly used for posting the ake video on X…
— ANI (@ANI) April 29, 2024

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओच्या संदर्भात रीतोम सिंग या व्यक्तीला अटक केली आहे, असे ट्विट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे, या संदर्भातील वृत्त देखील एएनआयने दिले आहे.

A man, Reetom Singh arrested in connection with the fake video involving Union Home Minister Amit Shah, tweets Assam CM Himanta Biswa Sarma pic.twitter.com/5esNDl2UQo
— ANI (@ANI) April 29, 2024