नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी
नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. काल मुंबई विमानतळावर अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर नागपुरातही याच प्रकारची ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे.
सीआयएसएफ निदेशकाना या प्रकारचा ई मेलवर धमकीचा हा इशारा मिळाल्यानंतर (सीआयएसएफ) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व स्थानिक पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. विमानतळावर अधिकच कडक तपासणी सुरू झाली आहे. एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करण्यात आली असून, नागपूर, मुंबईसोबत देशातील गोवा, भोपाळ, कोलकाता अशा इतरही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमानतळ उडविण्याची धमकी एकाच वेळी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे, सोलापूर येथे प्रचार दौऱ्यावर आहेत. आज (सोमवार) महाराष्ट्रात असताना अशा प्रकारच्या धमकीवजा इशाऱ्यामागे कुणाचा खोडसाळपणा की काही विघातक शक्तींचा हात आहे, या दृष्टीने तपासासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.
हेही वाचा :
PM Modi: इंडिया आघाडीत नेत्यावरून महायुद्ध सुरू: पीएम मोदी
Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha | नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट, शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून भरला अर्ज
लोकसभा निकालात कांदा कुणाला झोंबणार?; आठ मतदारसंघांत चुरशीच्या लढती