संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाल आहे. आनंदाची बाब म्हणजे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ‘न्यूयॉर्क टाईम्स …
संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाल आहे. आनंदाची बाब म्हणजे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला मिळाला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड म्हणाला की, गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता. अल्पावधीतच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी मिलियन व्ह्यूज चा टप्पा पार केला हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यात आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझं गाणं झळकलं. यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे. माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळं शक्य झालं ते माझ्या चाहत्यांमुळे.

त्यांनी माझ्या गाण्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे. त्यांच्या प्रेमामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे. चाहत्यांते ऋण मी कधीही विसरणार नाही. अशीच नवनवीन गाणी मी त्यांच्यासाठी कायम करत राहीन.

‘गुलाबी साडी’ या गाण्याला ‘यूट्यूब’वर ७० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘स्पॉटीफाय’वरही या गाण्याने १५ मिलियनचा टप्पा पार केला आहे.तसेच ‘यूट्यूब’वरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणा-या व्हिडिओंमध्ये आणि ‘स्पॉटीफाय’च्या जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Prajakta Bhalchandra Ghag 👑 (@prajakta_ghag)