ठाणेकर 12 तरुण-तरुणी पोहून रामसेतू करणार पार
ठाणे ः Bharat Live News Media वृत्तसेवा : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यातील 12 ते 18 वर्षे वयोगटातील तरुण भारतीय जलतरणपटू 3 आणि 4 मे रोजी राम सेतू पोहून पार करणार आहेत. रामसेतू हा तलाईमन्नार (श्रीलंका) आणि धनुष्कोडी (भारत), ह्या दरम्यानचा सागरी सेतू आहे. सुमारे 21 किलोमीटर पसरलेली पाल्क सामुद्रधुनी म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रभू रामचंद्रांना त्यांच्या कर्मस्थानी मानवंदना देण्यासाठी आणि नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या प्रित्यर्थ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ठाणे जिल्ह्यातील पहिली आंतरराष्ट्रीय जलतरण मोहीम असून या मोहिमेत अर्णव पाटील, अभीर साळसकर, स्वरा हंजनकर, वंशिका अय्यर, रुद्र शिराळी, शार्दुल सोनटक्के, अथर्व पवार, अपूर्व पवार, साविओला मस्कारेन्हस, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, मीत गुप्ते असे 12 तरुण-तरूणी पाल्क स्ट्रेट ओलांडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
जलतरणपटूंच्या संघाला मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार, ठाणे महानगरपालिकेच्या रामचंद्र ठाकूर जलतरण तलावात प्रशिक्षण देत आहेत.