LokSabha Elections | आमच्या भवितव्यासाठी तरी मतदान करा..! विद्यार्थ्यांचे पालकांसह आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘आम्ही मतदान करू शकत नाही; पण आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही नक्की मतदान करा’ असे आवाहन न्यू इंग्लिश मीडियम शाळेतील (एनईएमएस, शनिवार पेठ) विद्यार्थ्यांनी पालकांसह पुणेकरांना केले. मतदानाचा हक्क बजवावा, असे गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनीही सांगितले. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जागृतीसाठी साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ, श्रीशिवाजी मित्रमंडळ, भवानी पेठ …

LokSabha Elections | आमच्या भवितव्यासाठी तरी मतदान करा..! विद्यार्थ्यांचे पालकांसह आवाहन

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ‘आम्ही मतदान करू शकत नाही; पण आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही नक्की मतदान करा’ असे आवाहन न्यू इंग्लिश मीडियम शाळेतील (एनईएमएस, शनिवार पेठ) विद्यार्थ्यांनी पालकांसह पुणेकरांना केले. मतदानाचा हक्क बजवावा, असे गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनीही सांगितले. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जागृतीसाठी साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ, श्रीशिवाजी मित्रमंडळ, भवानी पेठ आणि न्यू इंग्लिश मीडियम शाळेतील प्राथमिक व माध्यमिक वर्गातील सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी मतदानाचे आवाहन करीत जनजागृती केली.
कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा यांचे होते. शाई लावलेल्या बोटासह ’व्होट 100 पर्सेंट’ दर्शवित काढलेल्या रांगोळीभोवती उभे राहून विद्यार्थी, पालक प्रतिनिधी व शिक्षकांनी विविध घोषणा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापक हेमांगी देशमुख, प्रीतम जोशी, शिल्पा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे आणि रोमा लांडे यांनी रंगावलीची रचना केली.
हेही वाचा

कोल्हापूर : मुख्यमंत्री शिंदे यांची प्रत्येक नेत्यासोबत वन-टू-वन चर्चा
कोल्हापूर : शहरात अनेक ठिकाणी नाल्यांचे झाले गटार
उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेगाड्या ‘हाऊसफुल्ल’; स्लीपर डबे बनताहेत जनरल