उद्धव ठाकरे विकृत माणूस : नारायण राणे

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे हा विकृत माणूस आहे. त्याला दुसर्‍याचे चांगले पाहवत नाही, अशी टीका महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी केली. मनसेने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरे केवळ दोन दिवस मंत्रालयात होते. केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या होत्या त्यावेळी त्यांनी जीएसटी संदर्भात विचारले असता ठाकरेंना काहीही …

उद्धव ठाकरे विकृत माणूस : नारायण राणे

सावंतवाडी; Bharat Live News Media वृत्तसेवा : उद्धव ठाकरे हा विकृत माणूस आहे. त्याला दुसर्‍याचे चांगले पाहवत नाही, अशी टीका महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी केली. मनसेने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरे केवळ दोन दिवस मंत्रालयात होते. केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या होत्या त्यावेळी त्यांनी जीएसटी संदर्भात विचारले असता ठाकरेंना काहीही उत्तर देता आले. त्यांनी महाराष्ट्राची अब्रू घालवली, असा घणाघात त्यांनी केला.
दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे आयोजित मेळाव्यात राणे यांनी इंडिया आघाडीवर टीका केली.
राणे म्हणाले, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. मात्र, विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही. देशाचे नेतृत्व करू शकणारा एकही नेता त्यांच्याकडे नाही. राहुल गांधी टी-शर्ट परिधान करून व दाढी वाढवून मार्गक्रमण करीत आहे. मात्र, देशातील जनतेच्या प्रश्नांचा कोणताही अभ्यास त्यांच्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवछत्रपतींचे नाव घेऊन आपले घर चालवले. जनतेच्या घराशी, त्यांच्या सुख-दुःखाशी त्यांना कोणतेच सोयरसुतक नाही. सोबतची माणसे सोडून गेली, पक्ष संपवला, धनुष्यबाण चिन्हही गेले, आता मशाल घेऊन कोणाची घरे जाळायला निघालात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.