छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; ३ चिमुकल्यांसह ९ ठार, २३ जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील बेमेटारा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला लोकांनी भरलेल्या पिकअपने धडक दिली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि ३ लहान मुलांचाही समावेश आहे, तर २३ जण जखमी झाले आहेत. ४ जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रायपूर एम्समध्ये पाठवण्यात आले आहे.
रविवारी (दि.२८) रात्री उशिरा काथिया गावाजवळ हा अपघात झाला. अपघातात बळी पडलेले सर्व पाथरा गावातील रहिवासी असून तिरैया गावात एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते.
