रत्नागिरी : टेरेसची चावी देत नसल्याच्या रागातून वॉचमनचा खून

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसची चावी देत नसल्याच्या रागातून वॅाचमनचा लाकडी दांडका आणि दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे. अशोक महादेव वाडेकर (60) असे या खून झालेल्या वॅाचमनचे नाव असून रत्नागिरीतील जेल रोड ते गवळीवाडा जाणार्‍या रस्त्यावरील रेगे कंपाउंडमध्ये शनिवारी (दि.२७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. …

रत्नागिरी : टेरेसची चावी देत नसल्याच्या रागातून वॉचमनचा खून

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसची चावी देत नसल्याच्या रागातून वॅाचमनचा लाकडी दांडका आणि दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे. अशोक महादेव वाडेकर (60) असे या खून झालेल्या वॅाचमनचे नाव असून रत्नागिरीतील जेल रोड ते गवळीवाडा जाणार्‍या रस्त्यावरील रेगे कंपाउंडमध्ये शनिवारी (दि.२७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संशयिताच्या रत्नागिरी शहर पोलिसांनी काही तासातच मुसक्या आवळल्या.
वेदांत चंद्रकांत आखाडे (21,रा.गणेश कृपा,जेलरोड,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. वेदांत आखाडेचा यापूर्वी तीन ते चार वेळा अशोक वाडेकर या वॉचमनशी तो रहात असलेल्या गणेश कृपा बिल्डिंगच्या टेरेसची चावी न देण्याच्या कारणावरुन वाद झालेला होता. वेदांत बिल्डिंगच्या टेरेसवर कबुतरांना दाणे टाकायचा परंतू कबुतरे त्याठिकाणी घाण करत असल्यामुळे सोसायटीने त्याला चावी न देण्याबाबत वॉचमन अशोक वाडेकर यांना सांगितले होते. त्यामुळे वाडेकर वेदांतला टेरेसची चावी देत नव्हते. याचा राग मनात धरुन त्याने शनिवारी सायंकाळी अशोक वाडेकर यांच्यावर पाळत ठेवली होती. शनिवारी सायंकाळी अशोक वाडेकर रेगे कंपाउंडमधून जाणार्‍या पायवाटेने घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून जात प्रथम लाकडी दांडक्याने आणि त्यानंतर दगडाने ठेचून त्यांचा निर्घूण खून केला.
खूनाची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन तपास सुरु केला. पोलिसांनी गणेश कृपा बिल्डिंगचे सीसीटिव्ही फूटेज तपासले असता त्यांना त्या बिल्डिंगमध्येच राहणारा वेदांत बिल्डिंगमध्ये शिरताना दिसून आला. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. दरम्यान,रविवारी वेदांतला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.