Pune : संविधान सन्मान दौडमध्ये धावले 7 हजार स्पर्धक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिनानिमित्त आयोजित संविधान सन्मान दौड (मिनी मॅरेथॉन) जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली. संविधानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे झालेल्या या दौडमध्ये 31 देशातील जवळपास 7 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर … The post Pune : संविधान सन्मान दौडमध्ये धावले 7 हजार स्पर्धक appeared first on पुढारी.
#image_title

Pune : संविधान सन्मान दौडमध्ये धावले 7 हजार स्पर्धक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिनानिमित्त आयोजित संविधान सन्मान दौड (मिनी मॅरेथॉन) जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली. संविधानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे झालेल्या या दौडमध्ये 31 देशातील जवळपास 7 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि पुणे जिल्हा हौशी अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या दौडचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, उप्पर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, भारत हा एकमेव देश आहे, जिथे स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून सर्वांना समान अधिकार मिळाला आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान असून, त्यांनी लोकशाही समृद्ध करण्याचे काम केले. सद्य:स्थितीत देशाला संविधानाच्या मूल्यांची गरज असून, त्यासाठी संविधान जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत या स्पर्धेचे आयोजक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती, पुण्याचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केले.
16 वर्षांखालील मुला/मुलींसाठी 3 कि.मी., 20 वर्षांखालील मुला/मुलीसांठी 5 कि.मी., तर सर्वांसाठी खुली 10 कि.मी. अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच दिव्यांग असलेल्या माजी सैनिकांसाठीही पॅरा मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या स्पर्धेत धावू न शकणार्‍या महिलांनी ‘वॉक फॉर संविधान’ रॅली काढली होती. या वॉकची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. पुढे जाऊन विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला. जिंकलेल्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. तसेच याप्रसंगी जागतिक पातळीवर धावपटू म्हणून नामांकन मिळवलेल्या अवंतिका नरळे, स्वेच्छा पाटील, शुभम भंडारे आणि प्रणव गुरव या खेळाडूंचाही विशेष सत्कार करण्यात आला.
The post Pune : संविधान सन्मान दौडमध्ये धावले 7 हजार स्पर्धक appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिनानिमित्त आयोजित संविधान सन्मान दौड (मिनी मॅरेथॉन) जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली. संविधानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे झालेल्या या दौडमध्ये 31 देशातील जवळपास 7 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

The post Pune : संविधान सन्मान दौडमध्ये धावले 7 हजार स्पर्धक appeared first on पुढारी.

Go to Source